Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. पंतप्रधान मोदींनी पेटलेल्या मणिपूरला शांत करणं गरजेचं आहे. मणिपूरमध्ये लिबिया सिरियासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
China is involved in the violence in Manipur – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मिळालेल्या माहितीनुसार मणिपूर अस्थिर करण्यामागे आणि मणिपूरच्या हिंसाचारामध्ये चीनचा हात आहे, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. मात्र, देशाचे संरक्षण मंत्री जम्मूला जातात आणि पाकिस्तानला दम देतात. पाकिस्तानात घुसण्याची धमकी देतात. पण सध्या त्या ठिकाणी शांतता आहे.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री तिकडे कशात काही नसताना पाकिस्तानला दम देत आहे. पण त्यांना मणिपूरला जाऊन चीनला डोळे वटारून दाखवण्याची गरज आहे. कारण मणिपूरमध्ये चीनचा हस्तक्षेप आहे. प्रश्न चीनचा आहे आणि सरकार दम पाकिस्तानला देत आहे.”
“राहुल गांधी (Rahul Gandhi) जर मणिपूरला जात असतील, तेथील जनतेशी संवाद साधून काही मार्ग काढणार असतील, तर राहुल गांधी यांच्या मणिपूर भेटीचं आम्ही स्वागत करू”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | अध्यक्ष महोदय…हम करे सो ‘समान’ कायदा; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Jitendra Awhad | “शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी…”; जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- Aditya Thackeray | मोठी बातमी! मुंबईत आदित्य ठाकरेंच्या गाडीचा झाला अपघात
- Ambadas Danve | संजय राऊतांना ईडीमार्फत ब्लॅकमेल केलं जात आहे; अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य
- Ambadas Danve | “केसीआर मटण खाऊन पंढरीला गेले अन्…”; अंबादास दानवेंची केसीआरवर खोचक टीका
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3r6BcN8