Sanjay Raut | “खिडकी नसलेल्या खोलीत ठेवले” ; संजय राऊतांची न्यायाधीशांकडे तक्रार, ED ने मागितली माफी
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले शिवसेना संजय राऊत यांना बुधवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचवेळी न्यायालयाने संजय राऊत यांची पुन्हा एकदा ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे. संजय राऊत यांना आता ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हणजेच त्यांना आता आणखी ५ दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. यापूर्वी राऊत यांना १ ऑगस्ट रोजी ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी राऊतांनी ईडीची तक्रार करत काही गोष्टींचा खुलासा केला. “ईडीने मला खिडकी नसलेल्या खोलीत ठेवले आहे. तिथे व्यवस्थित व्हेंटिलेशन नाही”, अशी तक्रार त्यांनी कोर्टकडे केली. कोर्टाने या तक्रारीची दखल घेऊन ईडीला सुनावलं आहे. तर ईडीने या प्रकरणी लेखी माफी मागितली असून राऊतांना एसी रूम देणार असल्याचे सांगितले आहे. पण त्याबरोबरच संजय राऊत हे चौकशी दरम्यान समाधानकारक माहिती देत नाहीत, असा आरोप देखील ईडीने केला आहे.
संजय राऊतांच्या पत्नीलाही ईडीने समन्स बजावले-
पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आता संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावले आहे. यापूर्वी, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी डिसेंबर २०२० मध्ये एकदा वर्षा राऊत यांची ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्यामार्फत त्यांच्या खात्यात ५५ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याची चौकशी झाली.
भाजपला संजय राऊतांची भीती वाटते-
ईडीने दाखवलेले सर्व व्यवहार खोटे असल्याचे संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी म्हटले आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आज न्यायालयाने संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे शिवसैनिक आहेत, ते कधीही भ्रष्टाचार करणार नाहीत. भाजपला त्यांची भीती वाटते.
महत्वाच्या बातम्या :
- CWG 2022 : भारताच्या खात्यात आणखी पदकांची कमाई, आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने !
- Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना तर एकनाथ शिंदेंनी सर्व बैठका केल्या रद्द
- Chandrashekhar Bawankule | प्रभाग रचनेच्या बदलावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया!
- Asia Cup 2022 : आशिया चषकात भारताच्या सलामी जोडीबाबत अजुनही प्रश्नचिन्ह, माजी क्रिकेटपटू म्हणाला…!
- Sanjay raut in ED custody | “संजय राऊतांना जबाब देण्यासाठी धमकावले जात आहे”; वकील मोहिते यांचा ईडीवर आरोप
Comments are closed.