Sanjay Raut | गुवाहाटीला जाणाऱ्या लोकांनी ‘या’ आदिवासी देशात जावं, संजय राऊतांचा सल्ला

Sanjay Raut | मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहे. त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन झाल्यानंतर पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदीचे चरणस्पर्श केले की गुडघास्पर्श ते नीट पाहा, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “पापुआ न्यू गिनी 60 लाख लोकसंख्येचा देश आहे. 60 लाख लोकसंख्येत साडेआठशे भाषा बोलल्या जातात. त्यांच्या जगाशी काहीही संबंध नाही. तो संपूर्ण अशिक्षित आणि आदिवासी देश आहे. खरंतर गुवाहाटीला जाणाऱ्या लोकांनी पापुआ न्यू गिनीला जायला हवं.”

“पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदींचे चरणस्पर्श केले याचा आनंद आहे. मात्र, तो देश अंधश्रद्धा आणि जादूटोणा यासाठी प्रसिद्ध आहे. अशा देशाच्या पंतप्रधानांनी मोदींचे चरणस्पर्श केले म्हणून भाजपचे लोक डंका वाजवतं असतील, तर त्यांना माझा सलाम आहे,” असेही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

“नरेंद्र मोदी समोर आले तर ते वयाने मोठे आहे म्हणून आम्ही त्यांना नक्कीच वाकून नमस्कार करू. ती आपली भारतीय संस्कृती आहे”, असेही संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Ox60jI