Sanjay Raut | “गृहमंत्र्यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन…”; राजा ठाकूरच्या पत्नीची राऊतांविरोधात तक्रार

Sanjay Raut | मुंबई : राज्यात सध्या सत्तासंघर्षावरुन सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाचे युक्तीवाद सुरु आहे. त्यातच  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून सुपारी देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

संजय राऊत यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून, आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच राजा ठाकूरच्या पत्नीने संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. राजा ठाकूरला गुंड संबोधल्याने पत्नी पूजा ठाकूर यांनी कापूर बावडी पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतांविरोधात तक्रार दिली आहे. पूजा ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राऊतांवर ताशेरे ओढले आहेत.

“माझ्या पतीला गुंड बोलणारे राऊत आहेत तरी कोण?”

“संजय राऊतांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केल्याने तक्रार दाखल केली. माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहेत. त्यांच्याकडे काय पुरावा आहे. कोणीतरी तुम्हाला संपर्क केली आणि तुम्ही वक्तव्य करत आहात, त्याला अर्थ नाही” पूजा ठाकूर म्हणाल्या आहेत.

Complaint of Pooja Thakur against Sanjay Raut

“तुम्ही पुरावे आणि सर्व गोष्टी समोर आणा. संजय राऊतांविरुद्ध आयीपीसी कलम 211 आणि कलम 120 ब अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी पूजा ठाकूरांनी केली आहे.

राजा ठाकूर याचं श्रीकांत शिंदेंशी काय नात आहे? 

“कळवा महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मी निवडणूक लढली आहे. तेव्हा आठवलं नाही, कोणत्या पक्षात आणि गटात होती. पण, यांचे वाद-विवाद वाढत आहेत”, असे पूजा ठाकूर म्हणाल्या आहेत.

“माझ्या प्रभागातील कामाच्या निमित्ताने श्रीकांत शिंदेंच्या नेहमी संपर्कात असते. लोकांचं कार्य आणि मदत करतो, याचा अर्थ असा नाही की कट रचत आहेत. तसेच, गृहमंत्र्यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी,” असेही पूजा ठाकूर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-