Sanjay Raut | चंद्रशेखर बावनकुळे केसीआर यांची वकिली का करताय? – संजय राऊत
Sanjay Raut | मुंबई: बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राज्यकारणात सक्रिय होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर निशाणा साधला आहे.
Chandrasekhar Bawankule does not need to be given importance – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांना एवढं महत्त्व देण्याची गरज नाही. चंद्रशेखर बावनकुळे भाजपची सी टीम आहे. त्यांच्या हातात काहीच नाही. भाजपचं सगळं दिल्लीत ठरत असतं. महाराष्ट्रातील भाजपची कमान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे केसीआर यांची वकिली का करताय? त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यायला हवं.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “भाजपनं आता राज्यात केसीआर (KCR) यांना बोलावलं आहे. मात्र, महाविकास आघाडी ही लढाई लढायला समर्थ आहे आणि ही लढाई महाविकास आघाडी जिंकणार आहे.”
“केसीआर यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचं हित बघावं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं हित बघण्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी येण्याची गरज नाही. ते आमच्या राज्यात हस्तक्षेप करत आहेत. महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी केसीआर यांना महाराष्ट्रात बोलवण्यात आलं आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी! नवी दिल्लीत आज होणार NCP ची बैठक
- IND vs IRE | ‘या’ तारखेला भारतीय संघ जाणार आयर्लंड दौऱ्यावर
- Vijay Wadettiwar | सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू – विजय वडेट्टीवार
- Jayant Patil | जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधान
- Eknath Shinde | त्यांनी आधी त्यांचा पक्ष आणि राज्य सांभाळावं; मुख्यमंत्री शिंदेंचा केसीआर यांच्यावर घणाघात
Original NEWS SOURCE – https://bit.ly/441ExM0
Comments are closed.