Sanjay Raut | “चांगला घटनातज्ञ अपात्रतेचा निर्णय 24 तासांत…” संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवला आहे. सविस्तर चौकशी करून याबाबत निर्णय देण्यात येईल, असं राहून नार्वेकरांनी सांगितलं आहे. अशात संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. एखादा चांगला कायदेतज्ञ 24 तासांत निर्णय देईल, अशा शब्दात संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीका केली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये सगळं काही बेकायदेशीरपणे चालू आहे. घटनेच्या पदावर विराजमान असलेल्या लोकांनी घटनेचे संरक्षण करायचं असतं. ते घटनेचे चौकीदार असतात. मात्र, घटनेच्या पदावर बसलेले व्यक्तीच घटनेचे मारेकरी ठरत आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीमध्ये आपण हे पाहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल या संस्थेवर ताशेरे मारले आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभेला एक प्रतिष्ठान आहे. ते एक घटनात्मक पद असून त्या पदावर बसलेल्या व्यक्तीनी निपक्ष पद्धतीने न्याय करायचा असतो. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहे. अध्यक्ष परदेशात किंवा इथे-तिथे जाऊन अनेक प्रकारच्या मुलाखती देत आहे. त्यातून गैरसमज निर्माण होतोय. या प्रकरणावर दबाव निर्माण होत आहे की काय? असं आम्हाला वाटू लागलं आहे.”

“राहुल नार्वेकर यांना अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. कारण हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडलं आहे. आधी त्यांच्या जागी झिरवळ होते. झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली राहुल नार्वेकर अध्यक्ष झाले आहे ना? एखादा चांगला घटनातज्ञ असेल तर तो 24 तासांत याबाबत निर्णय देईल”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MjQqVQ

You might also like

Comments are closed.