Sanjay Raut | “चिंचवडची जागा शिवसेनाच लढवणार”; सेना भवनातील बैठकीत शिवसेनेचा आग्रह

Sanjay Raut | मुंबई : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या जागांवरुन इच्छुक नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे. एकिकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात भाजपची (BJP) बैठक झाली तर महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत.

शिवसेना भवनात आज ठाकरे गटाची याच विषयावरून महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे. “पिंपरी-चिंचवडची जागा ठाकरे गटच लढणार, असा आमचा आग्रह आहे”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केले आहे. “कसब्यातील जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने लढावी, पण चिंचवडला ठाकरे गटाचाच उमेदवार उभा राहणार”, असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले आहे.

काय म्हणाले संजय राऊत म्हणाले?

“दोन जागांवर पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. या दोन्ही जागांवर आमदारांचे दुखद निधन झालेले आहे, त्यामुळे या निवडणुका घेतल्या जात आहेत. चिंचवडची पोटनिवडणूक आम्हीच लढावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. चिंचवड येथील मतदारांचाही तोच हट्ट आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे हे मातोश्रीवर आले होते. त्यावेळी या निवडणुकीविषयी चर्चा झाली. तेव्हा देखील कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने कसे लढावे हे आपण ठरवू. मात्र चिंचवडची जागा ही शिवसेनेकडे असावी, असे मत आम्ही मांडले” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

चिंचवडची जागा काँग्रेस-राष्ट्रवादी की शिवसेना लढणार, यावरून महाविकास आघाडीत अजून संभ्रम आहे. याबाबत संजय राऊत यांनी सांगितले, “अजित दादांचं काही म्हणणं होतं. आम्ही ऐकून घेतलं. पण चिंचवडची जागा आम्ही लढावी”, असं मत मांडल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.