Sanjay Raut | “जवानांची पुलवामात हत्या केली आणि नंतर त्याच राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात” : संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: 14 फेब्रुवारी 2019ला झालेल्या पुलवामा हल्ल्यासंदर्भात नुकताच जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी एका मुलाखतीदरम्यान खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना लक्ष्य केलं असून त्यांनी थेट त्यावेळी आपल्याला गप्प राहायला सांगितल्यातं आल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत( Sanjay Raut) यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दात प्रश्न विचारून टीकास्र सोडलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत (What did Sanjay Raut say)

खासदार संजय राऊत आपल्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात त्यांनी आज थेट भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “हा मोठा गौप्यस्फोट नाही. ही गोष्ट देशाला आधीच माहिती होती की पुलवामा हल्ल्यात काहीतरी घोटाळा आहे. यात तेव्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे तेव्हाचे सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील असं म्हटलं जात होतं. आम्ही हे प्रश्न वारंवार विचारायचा प्रयत्न केला की पुलवामा हल्ल्यात ३०० किलो आरडीएक्स पोहोचलं कसं? पुलवामाच्या रस्त्यावरून कधीही सुरक्षा कर्मचारी प्रवास करत नाहीत. त्यांना विमान का दिलं गेलं नाही? की त्यांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती? पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, देशद्रोही म्हणून गप्प करण्यात आलं”, असं संजय राऊत यांनी परखड शब्दातमोदींवर आणि भाजपवर टीका केली आहे.

सत्यपाल मलिक याचा गौप्यस्फोट: (Satya Pal Malik’s Secret Blast)

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीमध्ये खळबळजनक दावा केला आहे.सत्यपाल मलिक म्हणाले की, “सीआरपीएफनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा”, असा खळबळजनक गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.