Sanjay Raut | ” जिथे ठाकरे तिथं शिवसेना तसचं जिथं शरद पवार तिथं राष्ट्रवादी काँग्रेस” : संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी घेतलेला हा निर्णय कोणत्या परिस्थितीत आणि का घेतला याचं विश्लेषण तेच करु शकतात असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी दुपारी ट्विट करून देखील याबाबत भाष्य केलं होत. परंतु आता राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका मांडली आहे. तर दुसऱ्या बाजूला पवारांनी घेतलेल्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. तसचं काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनीही राजीनामा दिला होता. पण लोकमतामुळे त्यांना पुन्हा शिवेसनाप्रमुखांचा राजीनामा मागे घ्यावा लागला”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राजीनामा देणं त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय : संजय राऊत (Resignation is a personal issue of his party: Sanjay Raut)

याचप्रमाणे संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडत म्हटलं आहे की, शरद पवार यांनी विशिष्ट परिस्थितीत हा निर्णय घेतलेला आहे. पण शरद पवार यांनी फक्त पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही. शरद पवार हे एक स्तंभ आणि शिखर आहेत, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. तसचं पवार यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय आहे, असं देखील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. याचप्रमाणे पवार यांच्या नेतृत्वाची देशाला आणि राज्याला गरज आहे यामुळे त्यांनी विचार करावा. त्यांनी पक्षाचं अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडी अचानक घडल्या असल्या तरी त्यात अनपेक्षित असं काही नाही हे अलिकडच्या घडामोडींकडे समजलंच आहे. असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, राऊत यांनी पुढे बोलताना म्हंटलं की, त्यांचाच पक्ष गोंधळलेला आहे. त्यांच्याच पक्षाच्या आधारस्तंभाने राजीनामा दिला आहे. अशावेळी इतर पक्ष जाणं योग्य ठरणार नाही. या घडामोडींचा मविआवर काही परिणाम होणार नाही. शिवसेना पक्ष जसा ठाकरे या नावावरच चाललेला, जिथे ठाकरे तिथे शिवसेना. त्याचपद्धतीने जिथे शरद पवार तिथे त्यांचा पक्ष. अस संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. तर संजय राऊत हे लवकरच शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.