Sanjay Raut | जेव्हा तुमच्यासोबत कोणी नव्हतं, तेव्हा ‘सामना’ तुमच्या सोबत होता; संजय राऊत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चा असतात. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी राऊतांवर टीकास्त्र चालवलं होतं. जेव्हा तुमच्यासोबत कोणी नेता नव्हता, तेव्हा सामना तुमच्या सोबत होता, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर दिली आहे.

शरद पवार (Sanjay Raut) वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात होती. या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “सामनाला सर्वांनी महत्त्व दिलं पाहिजे असं आमचं मत नाही. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या सोबत कोणी नव्हतं तेव्हा सामना तुमच्या सोबत होता.”

सामना अग्रलेखात काय म्हटलं होतं? (What was said in the Samana Editorial?)

दरम्यान, शरद पवार (Sanjay Raut) यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी हादरली होती. कारण पवारांनंतर आपले कसे होणार? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे निर्माण झाला होता. पवारांनंतर राष्ट्रवादी सांभाळायला कुणीही वारस नाही. त्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि पवारांनी राजीनामा मागे घ्यावा लागला. राजकारणामध्ये शरद पवारांच्या शब्दाला मान आहे. पण पक्ष पुढे नेणारा वारसदार ते निर्माण करू शकले नाही

शरद पवारांची प्रतिक्रिया (Sharad Pawar’s reaction)

संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देत पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मला राजीनामा मागे घ्यावा लागला. आम्ही पक्षात काय करतोय याबद्दल राऊतांना माहिती नाही. आम्ही कुणाला संधी दिली आणि आम्ही काय केलं हे जाहीर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर आम्ही दुर्लक्ष करतो.”

महत्वाच्या बातम्या