Sanjay Raut | “जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू…”; किरीट सोमय्यांवर संजय राऊतांची टीका

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका, असं संजय राऊत ट्वीट करत म्हणाले आहे.

Do not kill with religion one who is going to die by his karma – Sanjay Raut

ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत.ते सांगायचे:” जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका” नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे.. जे जे होईल ते पाहत राहावे..जय महाराष्ट्र!”

दरम्यान, व्हायरल झालेल्या (Sanjay Raut) या व्हिडिओवर किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी याबद्दल चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, “मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्यांचे अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत, असे दावे केले जात आहे. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो.

त्यामुळे अशा सर्व आरोपाची आपण चौकशी करावी अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशी करावी अशी मी आपणास विनंती करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pM9XXZ