Sanjay Raut | “…तर तुम्ही मूर्ख आणि खोटारडे आहात”; उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा 

Sanjay Raut | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कधीही घराबाहेर पडले नाहीत, त्यामुळे आम्ही बंडखोरी केली, असा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जातोय. याच पार्वश्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दीड ते दोन वर्षे देशात कडक लॉकडाऊन होता. तुमच्याच पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. तुमचे पंतप्रधान स्वत: तोंडाला मास्क लावून घरात बसले होते. तुमचे केंद्रीय मंत्री आणि राज्यपालही घरात बसले होते.”

पुढे ते म्हणाले, “मात्र अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावं, अशी तुमची भूमिका असेल तर तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही खोटारडे आणि ढोंगी आहात. दीड ते दोन वर्ष केवळ महाराष्ट्र किंवा देशच नव्हे तर संपूर्ण जग करोना लॉकडाऊनच्या विळख्यात होतं.”

“लोकांमध्ये जाऊन गर्दी केली आणि नुसते कागदावर कोंबडे मारले म्हणजे कामं होतं, असं अजिबात नाही. ज्या गर्दीत तुम्ही कागदावर सह्या करता, त्यातील किती लोकांची कामं होतात. एकाचही होत नाही. तुमचे ४० आमदार सोडले तर कुणाचंही काम होतं नाही”, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.