Sanjay Raut | “तुम्ही गृहमंत्री आहात याचं भान ठेवा”; संजय राऊतांचे फडणवीसांना खडेबोल
Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सुपारी दिल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात नाव वाद निर्माण झाला. संजय राऊत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले आहेत.
“मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) निवडणुका लढवण्यात, पक्ष फोडण्यात व्यस्त असून लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचं त्यांना काही पडलं नाही”, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. यावर आता गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
संजय राऊत यांचा आरोप केवळ सनसनाटी निर्माण करण्या करता आहे. सुरक्षेचे विषय राजकारणाशी जोडणं अतिशय चुकीचं आहे, कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणं हे त्याही पेक्षा चुकीचं आहे, असं प्रतित्युत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
“संजय राऊत असो की कोणीही असो, असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता आहे का?, त्यांना काही सुरक्षा देण्याची गरज आहे का? ही सर्व कार्यवाही इंटेलिजन्स डिपार्टमेंट करत असतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काम करत नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
संजय राऊत बिनडोक आरोप करतात
“संजय राऊत यांना अलीकडच्या काळात प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण रोज कोणतातरी आरोप करायचा, कधी दोन हजार कोटींचा आरोप, कधी हल्ल्याचा आरोप, पण एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. पूर्वी त्यांच्या आरोपांना आम्ही उत्तर द्यायचो, पण आता इतके बिनडोक आरोप ते करतात, की त्याला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न पडतो”, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर
“हे जबाबदार गृहमंत्र्यांचे उत्तर नाही.सनसनाटी निर्माण करण्याचे शिक्षण तुमच्या प्रतिष्ठान मध्ये मिळत असेल.बाळासाहेब ठाकरे स्कूल मध्ये नाही सेनेतून फुटून गेलेल्या आमदार व चिल्लर गद्दार महामंडळास इतका फौजफाटा कशासाठी? चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका. गृहमंत्री आहात याचे भान ठेवा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
हे जबाबदार गृहमंत्र्यांचे उत्तर नाही.सनसनाटी निर्माण करण्याचे शिक्षण तुमच्या प्रतिष्ठान मध्ये मिळत असेल.बाळासाहेब ठाकरे स्कूल मध्ये नाही
सेनेतून फुटून गेलेल्या आमदार व चिल्लर गद्दार महामंडळास इतका फौजफाटा कशासाठी?
चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका. गृहमंत्री आहात याचे भान ठेवा .. https://t.co/nvDaepEhaA— Sanjay Raut (@rautsanjay61) February 21, 2023
महत्वाच्या बातम्या-
- Mahadev Jankar | “मंत्री असताना मी सांगायचो, काँग्रेस आणि भाजप दोन्ही फसवे पक्ष”; जानकरांची बोचरी टीका
- Sanjay Raut | “हे सुपारी बाजांचं राज्य आहे का?”; संजय राऊतांचा संतप्त सवाल
- Shivsena | मोठी बातमी: उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा पाठिंबा
- Naresh Mhaske | “त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू”
- Devendra Fadnavis | मुंबईत ‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’ पोस्टर्स झळकले; फडणवीस म्हणाले…
Comments are closed.