Sanjay Raut | “त्यांनी पत्र लिहलं तरी निवडणूक होणारच”; राज ठाकरेंच्या पत्रानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut | मुंबई : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः विविध पक्षांच्या नेत्यांना फोन करुन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून आवाहन केलं आहे.
“मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी,” असे राज ठाकरेंनी पत्रामध्ये म्हटलं आहे. चिंचवड-कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरकारकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दाखल दिला जात आहे. त्यावरुन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
“मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. आम्ही चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीत सर्व्हे केला असून दोन्ही मतदारसंघातील लोकांना निवडणूक हवी आहे. मतदारांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. शिक्षक, पदवीधरांनी जो निर्णय दिला, तसाच चिंचवड-कसबामध्येही लागेल. राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणे पत्र लिहिले असले तरी निवडणुका होतील”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
आणखी काय म्हणाले संजय राऊत? | Sanjay Raut Chinchwad Kasba Pune Byelection
“महाराष्ट्रात सर्वात आधी घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कोणी केली. राजकारण गढूळ कोणी केले? सुडाचे राजकारण कोणी सुरु केले? यावरही चिंतन व्हायला हवे. देवेंद्र फडणवीस मागे म्हणाले होते की, राजकारणातील कटूता कमी करण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण त्यांचे एकही पाऊल याबाबत पडलेले दिसत नाही. याबाबत राज्यातील जनतेला संभ्रम आहे. कसबा-चिंचवडसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढविणार होती, त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना चिंचवडच्या जागेबाबत आग्रही आहे. त्याबाबत मविआ लवकरच निर्णय घेईल.”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
Sanjay Raut Comment After Raj Thackeray Wrote Letter
सस्नेह जय महाराष्ट्र, ( Raj Thackeray Letter )
महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत.
मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.
कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.
MNS Raj Thackeray Should Make The Election Unopposed Pune Bypoll Election
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका ( Kasba-Chinchwad by-election unopposed ) होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.
राज ठाकरे – Raj Thackeray
‘ही’ परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे- गिरीश महाजन ( Girish Mahajan )
“एखादा आमदार यांचं निधन झाल्यास ती जागा त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला देण्याची प्रथा आहे. ही परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे”, असे आवाहन करत गिरीश महाजन यांनी “चिंचवडची जागा बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. काही ठिकाणी उमेदवार वेळेवर ठरलेत. आम्ही विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कमी पडलो. पण, पुढं येणाऱ्या निवडणुकीत आम्ही नक्की विजय मिळवू”, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Raj Thackeray – कसबा- चिंचवड पोटनिडणूक बिनविरोध करा; “भाजपने दाखवला तसा उमदेपणा महाविकास आघाडीने दाखवावा” – राज ठाकरे
- Devendra Fadnavis | “‘या’ विमानतळाचं श्रेय नारायण राणेंचंच”; चिपी विमानतळाच्या श्रेयवादाला पुन्हा तोंड फुटले
- Narayan rane | “मी भाजपमध्ये आलो अन् अडचणीत सापडलो”; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य
- Amol Mitkari | “फडणवीस तांबेंना गोंजरण्याचं काम करत असले तरी…”; अमोल मिटकरींची भाजपवर बोचरी टीका
- Congress | “फॉर्म मिळाल्यानंतर सत्यजीत तांबेंनी ‘OK’ उत्तर पाठवलं होतं”; काँग्रेसने सादर केले पुरावे
Comments are closed.