Sanjay Raut | त्र्यंबकेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडणाऱ्यांची चौकशी करा; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “हिंदुत्वाच्या नावावर राज्यात दंगली घडवून आणण्याचं षडयंत्र सुरू आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. मात्र, ज्या लोकांनी गोमूत्र शिंपडलं आहे तेच दंगलखोर आहे, त्यामुळे त्यांची चौकशी करा.”
भाजपचे राष्ट्रीय नेते जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आज त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “सावरकर विज्ञानवादी आणि हिंदुत्ववादी होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडावं, हे सावरकरांनी मान्य केलं नसतं. नड्डांनी आधी त्याला निषेध करावा, आणि मगच सावरकरांच्या कुटुंबीयांना भेटावं.”
दरम्यान, संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभेला एक प्रतिष्ठान आहे. ते एक घटनात्मक पद असून त्या पदावर बसलेल्या व्यक्तीनी निपक्ष पद्धतीने न्याय करायचा असतो. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहे. अध्यक्ष परदेशात किंवा इथे-तिथे जाऊन अनेक प्रकारच्या मुलाखती देत आहे. त्यातून गैरसमज निर्माण होतोय. या प्रकरणावर दबाव निर्माण होत आहे की काय? असं आम्हाला वाटू लागलं आहे.”
“राहुल नार्वेकर यांना अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. कारण हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडलं आहे. आधी त्यांच्या जागी झिरवळ होते. झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली राहुल नार्वेकर अध्यक्ष झाले आहे ना? एखादा चांगला घटनातज्ञ असेल तर तो 24 तासांत याबाबत निर्णय देईल”, असंही राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “चांगला घटनातज्ञ अपात्रतेचा निर्णय 24 तासांत…” संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला
- J. P. Nadda | पुण्यात जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक!
- Sanjay Raut | भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनं महाराष्ट्रात लुडबुड करू नये; संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र
- Sharad Pawar | शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या ‘या’ नेत्याला राष्ट्रवादीतून बडतर्फ
- Sadabhau Khot | शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळण्यासाठी गुजरात पॅटर्न लागू करा : सदाभाऊ खोत
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Wf3792
Comments are closed.