Sanjay Raut | त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून संजय राऊतांचं सरकारवर टीकास्त्र, म्हणाले…

Sanjay Raut | मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी एसआयटी चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर प्रकरणावर आक्षेप घेत संजय राऊत म्हणाले, “त्र्यंबकेश्वर प्रकरणाबाबत मी माहिती घेतली आहे. त्या लोकांची ही शंभर वर्ष जुनी परंपरा असून ते लोक मंदिराच्या गेटवरून देवाला धूप दाखवतात आणि पुढे त्यांच्या मार्गाला लागतात. आम्ही आणि प्रधानमंत्री सुद्धा अनेक वर्षापासून अजमेर दर्ग्यावर आणि मुंबईच्या हाजी अली दर्ग्यावर दर्शनासाठी जात असतो. त्याच प्रकारे ते लोक मंदिराबाहेर दर्शनासाठी येतात.”

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या सर्व घडामोडी ठरवून करण्यात आल्या आहे. मंदिर प्रशासनावर दबाव आणून त्यांना तक्रार करायला भाग पाडले आहे.” रामनवमीच्या काळात देखील राज्यात दंगली झाल्या होत्या. तेव्हा सरकारला एसआयटी नेमावी नाही वाटली का?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये नक्की काय घडलं? (What exactly happened in Trimbakeshwar?)

13 मे रोजी एका गटाकडून त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मयात्रा करण्यात आली होती. या दरम्यान काही जणांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मंदिरातील पुरोहितांनी त्यांना विरोध केला होता. त्याचबरोबर मंदिरातील सुरक्षारक्षकांनीही त्यांना अडवले होते. त्यामुळे काही काळ मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मंदिरातील पुरोहितांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली.

महत्वाच्या बातम्या