Sanjay Raut | दिल्ली दरबारात महाराष्ट्राचा पायपुसणं झालंय; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका

Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केला होता. न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवला आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.

आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “आमच्या दृष्टीने सध्याचे सरकार बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळणे अयोग्य आहे. सध्या दिल्लीच्या दरबारामध्ये महाराष्ट्राचा पायपुसणं झालं आहे आणि त्याला जबाबदार शिंदे-फडणवीस सरकार आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्हाला देशातील हुकुमशाही नष्ट करायची आहे. हुकूमशाही विरोधात आमचा लढा आहे. शिंदे गटाचा पोपट मेलेला आहे. फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचं बाकी आहे.”

दरम्यान, माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार नाही. हे 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही.” अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.