Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.

Sanjay Raut targets Devendra Fadnavis

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून आम्हाला बाळासाहेब शिकण्याची गरज नाही. आमच्यावर तेवढी वाईट वेळ आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावं. बाळासाहेबांनी कधी बेईमानांना जवळ केलं नाही.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “गद्दारांना लाथा मारून हाकलून द्या असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. मात्र, देवेंद्र फडणवीस काल गद्दारांच्या गाड्या चालवत होते. काल ते गद्दारांच्या बाजूला बसून गाडीत फिरत होते.”

“आमचा विरोध नवीन संसद भवनाला नाही. राष्ट्रपतींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला बोलावलं नाही, या गोष्टीला आमचा विरोध आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते उद्घाटन न करून पुन्हा एकदा देशाच्या संविधानाचा अपमान करण्यात आला आहे”, असंही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MXHhnD

You might also like

Comments are closed.