Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे – संजय राऊत

Sanjay Raut | नागपूर : देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षाचे नेते असताना विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला होता. आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराचे प्रकरण जे विरोधी पक्ष  काढत आहे. ती बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहे. एवढे देवेंद्र फडणवीस कसे बदलले, असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नागपूरला आलो आहे. आम्ही म्हणालो काही बॉम्ब फोडू. काल उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, वाती तयार आहेत अजून अधिवेशन संपलं नाही. सीमा प्रश्नावरचा ठराव अत्यंत महत्वाचा आहे. ज्याप्रकारे ठराव तयार केला तो अतिशय भुलसट आहे. त्या ठरावात संपूर्ण प्रदेश केंद्र शासित करावा याचा उल्लेख नाही, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस मनापासून करत असतील असे मला वाटत नाही. त्यांची काही मजबूरी असेल. त्यांच्यावर लादलेल सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.