Sanjay Raut | “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मिळून शिंदे गटाचा मस्त कार्यक्रम…”; संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut | मुंबई: आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोघांचाही वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी बॅनर्स दिसले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis and Ajit Pawar have a very close relationship – Sanjay Raut

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी बॅनरबाजी बघायला मिळाली आहे. या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे मिळून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा कार्यक्रम करतील.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दोस्ती आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे खूप जवळचे संबंध आहे. हे दोघे मिळून शिंदे गटाचा अगदी मस्त कार्यक्रम करतील. सगळं काही ठरलेल्या स्क्रिप्टप्रमाणेच होणार आहे आणि हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे.”

दरम्यान, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये बॅनर्स झळकले आहे. या बॅनरवरच्या मजकुरानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

‘ही दोस्ती तुटायची नाही’ असं या बॅनरवर लिहिलेलं (Sanjay Raut) आहे. तर यावर अजित पवारांचा ‘राजकारणातील दादा’ आणि देवेंद्र फडणवीस यांचा ‘राजकारणातील चाणक्य’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

तर दुसरीकडे मुंबईमध्ये देखील जोरदार बॅनर्जी पाहायला मिळाली (Sanjay Raut) आहे. मुंबईमध्ये वर्षा बंगला परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर्स दिसले आहे.

यावर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ आणि ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या बॅनरबाजीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43BUyaj