Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस कदाचित झोपेत बडबडत असतील; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला

Sanjay Raut | मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधी बाबत भाष्य केलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची मिस्ट्री समजून घ्यायची असेल तर त्यांची हिस्ट्री समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis has no new issue – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणता नवीन मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टानं निर्णय घेण्यासाठी दिलेल्या मुदतीचा अर्धा वेळ संपला आहे. त्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस झोपेत बडबडत असतील. त्यामुळे त्यांच्याकडं फार लक्ष देऊ नका. त्यांचं सरकार शंभर टक्के कोसळणार आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “शिंदे-फडणवीस यांचं सरकार हे औटघटकेचं आहे. शरद पवारांनी एखादी गोष्ट केली आहे. तर ठीक आहे ना. त्यात काही नवीन नाही. तुम्ही प्रयोग केला तुमचा प्रयोग फसला. तुमचा प्रयोग तुमच्या अंगलट आला आहे.”

यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, “मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात आहे, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. मात्र, नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री जम्मूला जाऊन पाकिस्तानला दम देतात. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना मणिपूरला जाऊन चीनला दम देण्याची गरज आहे. कारण मणिपूरमध्ये चीनचा हस्तक्षेप आहे.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44lte10