Sanjay Raut | मुंबई: कोविड काळात मुंबई महानगरपालिकामध्ये झालेल्या घोटाळ्यावरून ईडी चौकशी (ED Inquiry) करत आहे. या चौकशी दरम्यान ईडीनं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी धाड टाकली. या चौकशीनंतर ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सुडाच्या भावनेनं ही कारवाई सुरू आहे. त्यामुळे या सरकारशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. कट, कारस्थानं, सुडाच्या कारवाया करणं यामध्ये या सरकारचा वेळ चालला आहे. भ्रष्टाचारासंदर्भात देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलत होते. तुम्हाला जर भ्रष्टाचाराविरोधात खरंच काही करायचं असेल, तर आपल्या घरापासून साफसफाई सुरू करा.”
Investigate Eknath Shinde – Sanjay Raut
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “तुम्ही जर खरंच सच्चे असाल, तुमच्यावर खरोखर संघाचे संस्कार असतील, तर तुमच्या बाजूला बसलेल्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या पोरांची चौकशी करा. कारण जर कोविड घोटाळा झाला असेल तर ही सर्व लोकं त्यातील लाभार्थी आहे.”
“ईडी जर खरंच कारवाई करणार असेल तर मी उद्या अब्दुल सत्तारांच्या विरोधात 70 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे देतो”, असही ते यावेळी म्हणाले. राहुल कुल, दादा भुसे यांच्यावर कधी कारवाई होणार? असा सवाल देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या चिंतेत भर? मुंबई महानगरपालिकेच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर ED ची छापेमारी
- Ajit Pawar | अजित दादांना दाढी नसल्याने तो फिल येत नसेल; शिंदे गटाची खोचक टीका
- Ajit Pawar | अजित पवार की जयंत पाटील, कोण असणार राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी दावेदार? पवारांनी स्पष्ट सांगितलं
- Asia Cup 2023 | अभिमानस्पद! बांगलादेशचा पराभव करत भारतीय महिला संघानं कोरलं आशिया कपवर नाव
- Gulabrao Patil | गद्दारी करायची असती तर राज ठाकरे आणि राणेंसोबतच गेलो असतो – गुलाबराव पाटील
Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/sanjay-raut-verbal-attack-on-devendra-fadnavis-over-bmc-covid-scam-ed-inquiry/?feed_id=45453