Sanjay Raut | “देवेंद्र फडणवीस यांची बुद्धी प्रगल्भ पण…” ; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut | मुंबई : महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत (Mumbai) मोर्चा काढण्यात आला. महामोर्चातून महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन केले. हा नॅनो मोर्चा असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांची बुद्धी प्रगल्भ आहे पण नॅनो मोर्चा बोलने चुकीचे आहे. कालचा विराट मोर्चा त्यांना नॅनो दिसत असेल तर त्यांना दिल्लीला गेल्यावर गुंगीचे इंजेक्शन दिलं असेल आणि त्याची गुंगी अजून उतरली नाही. कालचा मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या शक्ती विरोधात होता आणि या मोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी सामोर जायला पाहिजे होतं असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.”

“देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची अवहेलना फार करून घेऊ नये. आपलं राजकीय भविष्य मोठं होणार आहे.  त्यांच्याकडे ती क्षमता आहे, असा खोचक टोला लगावला संजय राऊत यांनी लगावला. सध्याच्या सरकारने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला असून हे जनतेला मान्य नाही. जनतेने राज्यपालांना डिसमिस केलं असून हीच जनता आता सरकारला देखील डिसमिस करेल, असे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.