Sanjay Raut | “देशात हिंदू नेत्यांचं राज्य असूनही आक्रोश मोर्चा काढावा लागणं दुर्देवाचं”; संजय राऊतांचा भाजपला टोला 

Sanjay Raut | मुंबई : लव्ह जिहादला विरोध दर्शविण्यासाठी आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाने विरोट मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये शिंदे गट आणि भाजपचे काही नेतेही सहभागी झाले होते. मोर्चासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन शक्तीमान हिंदू नेत्यांचं देशात राज्य आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील हिंदुंचं राज्य आलं असं सांगण्यात येत आहे. तरी देखील राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे,” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला.

पुढे ते म्हणाले, “हा आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. या देशात शक्तीमान हिंदू नेत्यांचं राज्य असताना काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित न्याय मागण्यासाठी आक्रोश करत आहेत. ज्या मुलायमसिंह यादव यांनी राम सेवकांवर गोळ्या चालवल्या त्यांचा निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. त्यामुळं या आक्रोश मोर्चाचं स्वागत करायला पाहिजे.”

मोर्चेकऱ्यांनी यावेळी शिवसेना भवनसमोर घोषणाबाजी केली. यावर आजच्या मोर्चातील लोकांना शिवसेना भवनसमोर येऊन आक्रोश करावा लागला कारण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो हिंदूंचा आवाज ऐकतो, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी हाणला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.