Sanjay Raut | “धार्मिक तणाव निर्माण करून..” ; संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य

Sanjay Raut | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलं आहे. या प्रकरणावरून एसआयटी चौकशी करण्यात येणार, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. विरोधक नव्हे तर राज्य सरकार दंगली घडवून आणत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

नाशिकमध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “देशामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणारी फॅक्टरी सत्ताधारी पक्षाने सुरू केली आहे. राज्यातील वातावरण अस्थिर करून पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याचे षडयंत्र रचले जात आहे. धार्मिक तणाव निर्माण करून मत मागायची, असा प्रकार राज्यात सुरू आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “नाशिकमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा ही राज्य सरकारची इच्छा आहे. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य पद्धतीने काम करत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. राज्यात दंगली सुरू झाल्या आहे. यामागे अनैतिक आघाडी आहे.”

“सरकारवर यापूर्वीही टीका झाली आहे. त्याचबरोबर राज्यात देखील अनेकदा सरकारवर टीका करण्यात येते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीकास्त्र चालवण्यात येत होते. मात्र, त्यावेळी आम्ही कोणालाही तुरुंगात टाकले नाही”, असं देखील ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.