Sanjay Raut | नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला आमचा बहिष्कार – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: 28 मे रोजी नव्या संसद भवनाचा (Parliament House) उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. नव्या संसद भवनाची काय गरज होती? आपली जुनी संसद आणखी शंभर वर्ष टिकेल इतकी बळकट आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Our boycott of the inauguration of the new parliament building – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असताना सेंट्रल व्हिस्टा का उभारलं आहे? आपली जुनी संसद आणखी शंभर वर्ष टिकेल इतकी बळकट आहे. तरीही नवीन संसद उभारली गेली. 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास काँग्रेससह आमचा बहिष्कार आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “नवीन इमारत तयार करून सरकारने काय साध्य आहे? या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते का होत नाही? काँग्रेससह आम्ही देखील या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहोत.”

“राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (Droupadi Murmu) एक आदिवासी महिला आहे. आम्ही त्यांना राष्ट्रपती केलं असं नरेंद्र मोदी आणि भाजप नेते सांगतात. तर मग नव्या संसदेच्या उद्घाटनाचा मान त्यांना का नाही? असा सवाल देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45qfVxv

You might also like

Comments are closed.