Sanjay Raut | नारायण राणेंच्या शाब्दिक हल्ल्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Sanjay Raut | नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या नाशिक दौऱ्यावर गेले आहे. त्यांच्या दौऱ्यापूर्वी 40हून अधिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. नाशिक दौऱ्यात संजय राऊत एका क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर शाब्दिक फटकेबाजी केली.

राम कदम (Ram Kadam) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांसोबत बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. नारायण राणे म्हणाले, “मी एक ना एक दिवस उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. मी जेव्हा खासदार झालो तेव्हा संसदेमध्ये असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. तेव्हा ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बद्दल जे काही बोलले आहे ते मी उद्धव ठाकरे यांना भेटून सांगणार आहे. ते ऐकल्यावर उद्धव ठाकरे संजय राऊत यांना चपलेने मारतील.”

नारायण राणे यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर खूप घाणेरडे आरोप केले आहेत. पुरावे नसताना त्यांनी आदित्य ठाकरेला बदनाम केलं आहे. राणे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे विषयी काहीही बोलत होते. राणे यांच्या वक्तव्यावर माझं उद्धव ठाकरेंसोबत बोलणं झालं आहे. त्यावेळी ते हसत होते.”

नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर मी त्यांना कधीच भेटलो नाही. मी बेईमान लोकांना भेटतं नाही. मात्र, राणेंना उद्धव ठाकरे यांना भेटायची इच्छा झाली असली, तरी त्यांनी आमच्या नादाला लागू नये, असं देखील ते यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.