Sanjay Raut | पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

Sanjay Raut | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवेसनेच्या ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्या प्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीतील सभेत केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख करत, संजय राऊत यांनी शशिकांत वारिसे हत्या प्रकरणावरून मोठं वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“पत्रकार शशिकांत वारिसे यांनी माझ्या माहितीप्रमाणे रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी भविष्यात विकण्यासाठी कवडीमोल किंमतीत जमिनी घेतल्या, हे जमीनदार कोण आहेत? या संदर्भातील माहिती देण्यास सुरुवात केली होती. रिफायनरी समर्थक, सरकार पक्षातील सध्याचे काही लोक, रत्नागिरीमधील काही राजकारणी, यांचं या प्रकरणात जमिनी घेण्यात कसं परप्रांतीयांबरोबर साटंलोटं आहे. राजापूरात, नाणारच्या आसपास अब्जावधी रुपयांच्या जमिनींचे व्यवहार झाले. त्यासंदर्भात शशिकांत वारिशे यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते त्याभागातील काही राजकारण्यांच्याही डोळ्यात खूपत होते”, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.

आणि दुसऱ्याच दिवशी वारिसे यांची हत्या

“सध्या जे पालकमंत्री आहेत आणि ज्यांनी सुपारी घेतलेली आहे, रिफायनरी आणणारच किंवा तिथले जे केंद्रीयमंत्री आहेत आणि त्यांचं कुटुंबं आहे. काही झालं तरी विरोध मोडून काढून आम्ही रिफायनरी आणणारचं. आगणेवाडीच्या जत्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जाहीर सभा घेतली आणि त्या सभेत रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या. ‘रिफायनरी करून दाखवतो, कोण आडवं येतं पाहू’ अशा प्रकारची भाषा केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“हा योगयाग समजायचा की अजून काय?” 

24 तास अगोदर राज्याचे गृहमंत्री सांगतात, रिफायनरीला कोण आडवं येतंय ते पाहू आणि दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा एक तरूण पत्रकार शशिकांत वारिसे मारला जातो. याचा काय संबंध लावायचा, हा योगयाग समजायचा की अजून काय समजायचं?”, असा आरोप करणारा प्रश्न संजय राऊतांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.