Sanjay Raut | पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करावा – ईडीची मागणी

Sanjay Raut | मुंबई : संजय राऊत यांचा ईडी मधील मुक्काम संपला असून काही दिवसांपुर्वीच ते न्यायालयीन कोठडीत गेले आहेत. त्यांच्या जामीनसाठी त्यांनी अर्ज देखील आहे. ज्यावर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे. यावेळी ईडी युक्तीवाद मांडणार असून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करावा, अशी मागणी ईडीने केली आहे.

ईडी कडून संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मागणी –

संजय राऊत यांचा मोहरा प्रविण राऊत होता. प्रवीण राऊत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. सोडून आणखीन कंपन्यांचाही कारभार पाहायचा. त्याने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावर ३.२७ कोटी रुपये वळवले होते. आमच्यासमोर आणखी काही नोंदी येत असून, तपास सुरू आहे, असा युक्तिवाद ईडीतर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांनी विशेष न्यायालया केला.

प्रवीण राऊत कंपनीच्या कामात सक्रिय होते आणि संजय राऊतही त्यांना मदत करत होते. पत्राचाळीच्या पुनर्विकासात संजय राऊत यांचा सक्रिय सहभाग होता. ईडीने नोंदविलेल्या जबाबांवरून असे समोर आले आहे की, संजय राऊत यांना सदनिका खरेदी करण्यामध्ये स्वारस्य होते. काही लोकांनी एकत्रितपणे १३ लाख रुपये वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात जमा केले. कारण त्यांना संजय राऊतांना नाखूश करायचे नव्हते, असा युक्तिवाद सिंग यांनी न्यायालयात मांडला आहे.

दरम्यान, न्यायालयीन कोठडीत जाण्यापुर्वी शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलं आहे. डोळ्यात पाणी आणण्यासारखे बोल या पत्रात लिहिण्यात आले होतं. संजय राऊत यांच्या भावनिक पत्राची जोरदार चर्चा रंगली असतानाच मनसे नेत्या स्नेहल सुधीर पारकर यांनी घंट्याचं भावनीक पत्र म्हणत टीका केली होती.

यादरम्यान, स्नेहल सुधीर पारकर यांनी ट्वट करत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पत्राचाळ येथे राहणाऱ्या लोकांची मत ऐकून घेण्यात आली असून त्यांच्या घरांची अवस्था देखील दाखवण्यात आली होती. तसेच घंट्याच भावनिक पत्र असं म्हणत जो मीडिया आज संजय राऊत यांच्या चार ओळींना भावनिक वैगरे बोलतोय, त्या मीडियाने एकदा पत्रा चाळ रहिवाश्यांची अवस्था पाहा, असं कॅप्शन पारकर यांनी दिलं आहे. तसेच राऊतांच्या अटकेनंतर सहकुटुंब त्यांच्या घरी भेट देणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्राचाळ रहिवाश्यांना भेटायला का नाही गेले ?, असा सवाल देखील पारकरांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.