Sanjay Raut | पुतीन, बायडेन, चार्ल्स, झेलेन्स्की यांच्याकडून उद्धव ठाकरे कोण विचारणा ; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut | नागपूर : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही शिंदे गटाच्या उठावाबद्दल उत्सुकता आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपहासात्मकपणे  खोचक वक्तव्य केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, पुतीन आणि चार्ल्स यांनी एक बैठक घेऊन उद्धव ठाकरे कोण, अशी विचारणा केल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, सध्याचे इंग्लंडचे महाराज चार्ल्स या तिघांची सकाळी कॉन्फरन्सिंग झालं अन् त्यांनी विचारलं की उद्धव ठाकरे कोण आहेत. या माणसाची कमाल आहे. हा माणूस हार मानत नाही. त्याच्यावर किती संकटे आली. हा माणूस कोण आहे. उद्या जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर आम्हाला उद्धव ठाकरे यांचा सल्ला घ्यावा लागेल. म्हणून उद्धव ठाकरेंना आपण भेटलं पाहीजे.”

“हा माणूस कोण आहे, असं जो बायडन यांनी पुतीनला विचारलं. अरे मोदीजी को पुछो ये उद्धव ठाकरे कोण है, तुम्ही आतापर्यंत त्यांची भेट का नाही घालून दिली. झेलेन्स्की विचारतात उद्धव ठाकरे कोण आहेत. देशातील युद्धाची जी परिस्थीती आहे. सर्व जगातले वातावरण निराश आहे. अशावेळेला उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने लढत आहेत. कारण ही सुद्धा सेनाच आहे, ही आमची फौज आहे. त्यामुळे देशातील प्रमुख लोक विचारत आहेत. उद्धव ठाकरे कोण आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना टोला लगावताना संजय राऊत म्हणाले, क्लिंटन विचारत नाही. त्यांचा जमाना केव्हाच संपला, हे कळले पाहीजे.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे –

“माझ्याकडे गेल्या एक महिन्यापूर्वी एक माणूस आला होता. तो बिल क्लिंटनकडे राहतो. तो खरा भारतीय आहे. पण त्यांच्याकडे तो आहे. बिल क्लिंटन त्याला म्हणाले. एकनाथ शिंदे, कोण आहे, केवढे काम करतात, कधी खातात, कधी झोपतात”, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.