Sanjay Raut | “भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांचा इतिहास पण पुसला जाईल”; संजय राऊतांचा घणाघात 

Sanjay Raut | मुंबई : भाजपने राहुल यांचा जयचंद असा उल्लेख केला होता. यावर उत्तर देताना कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपाला सुनावलं. आमच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले, पण तुम्ही काय केले? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का?, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला होता. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

ते म्हणाले, वीर सावरकर, भगत सिंहसारखे क्रांतिकारी होते. ते कोणत्याही पक्षासोबत जोडले गेले नव्हते. ते त्यांचे कार्य वेगळ्या पध्दतीने करत होते. खर्गे यांनी वक्तव्य केले आहे तर भाजपने प्रतिवाद करायला पाहिजे. स्वातंत्र्याची लढाई सुरु आहे. देशासाठी ही मोठी गोष्ट आहे.

“जे आंदोलन झाले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वामध्ये झाले. जनता कॉंग्रेसच्या नेतृत्वामध्येच शहीद होण्यासाठी व जेलमध्ये जाण्यासाठी तयार होती हा इतिहास आहे. आणि इतिहास कोणी बदलू शकत नाही. आम्हीही कॉंग्रेसवर अनेक वेळा टीका केली आहे. पण हा इतिहास आहे. आणि तुम्ही इतिहासाला कसे बदलणार?”, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

टिळक, सरदार वल्लभ पटेल, गांधीच्या नेतृत्वाखाली आंदोलने झाली. पण, या जनतेला जागरुक करण्यासाठी ब्रिटीशांविरोधात लढा देण्याचे काम हे कॉंग्रेस पक्षानेच केले आहे. स्वातंत्र्य लढ्यात तुमचे योगदान असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे. आझादीचे अमृत महोत्सव सुरु असताना प्रश्न निर्माण झाला आहे. याचा अर्थ स्वातंत्र्य कोणा एकाच्या मालकिचे नसते, असं संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आझादी अमृत महोत्सव सुरु आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी काम केले आहे. तो पक्ष सत्तेत नाही त्यांच्याशी तुमचे वैचारीक मतभेद आहेत. म्हणून त्यांचे योगदान तुम्हाला नाकारता येणार नाही. उद्या जेव्हा भाजप केंद्रात सत्तेत नसेल तेव्हा त्यांनी लिहीलेला इतिहास पुसला जाईल, असा टोला राऊतांनी लगावला.

You might also like

Comments are closed.