Sanjay Raut | भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनं महाराष्ट्रात लुडबुड करू नये; संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

Sanjay Raut | मुंबई: भाजप नेते जे. पी. नड्डा (J. P. Nadda) महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबई येथे त्यांच्या भेटीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. जे. पी. नड्डा राष्ट्रीय नेते आहे, त्यांनी मुंबईत येऊन लुडबुड करू नये, या शब्दात संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ” जे. पी. नड्डा तुम्ही भाजपचे राष्ट्रीय नेते आहात. मुंबईमध्ये येऊन लुडबुड करू नका. मुंबई ताब्यात घेण्यासाठी तुम्ही बेकायदेशीर मार्गाने प्रयत्न करत आहात. कर्नाटकमध्ये तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. तुम्ही त्यावर बोलायला हवं. कर्नाटक हे भाजपच्या काळातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार होतं.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजप सरकारच्या काळात मिस्टर 40% असं कर्नाटकमधील उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना म्हटलं जात होतं. नड्डांनी त्यावर बोलावं. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारने किती हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, याची प्रकरण मी त्यांना पाठवून देईल, त्यांनी त्यावर भाष्य कराव.”

“मी विधिमंडळाला चोर म्हणालो नाही. मी बंडखोर आमदारांना चोर म्हणालो आहे. त्याचबरोबर मी समितीसमोर हक्कभंगाची बाजू मांडणार आहे. देशातील लोकशाही संकटात आहे”, असं देखील ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MEnWaW