Sanjay Raut | भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा म्हणजे शिंदे गट; संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. शिंदे गट (Shinde group) म्हणजे भारतीय जनता पक्षाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे.

Sanjay Raut’s criticism to the Shinde group

माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शिंदे गट हा कोणताही पक्ष नाही. भाजपने पाळलेला तो एक कोंबड्यांचा खुराडा आहे. भाजप या कोंबड्या कधीही कापू शकतो. पक्ष म्हणून शिंदे गटाकडे कोणतीही विचारधारा नाही.”

यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “हा विषय सुप्रीम कोर्टाचा नाही तर नैतिकतेचा आहे. भारतीय जनता पक्षाने आमची भूमिका समजून घ्यायला हवी. कारण हा संविधानाचा आणि देशाचा सन्मानाचा प्रश्न आहे.”

“नवीन संसद भवनाच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचं नाव नाही. या कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण तरी द्या. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना या उद्घाटन सोहळ्याला का नाही बोलावलं? यावर कोणी बोलायला तयार नाही. हा फक्त पक्षाचा कार्यक्रम आहे की एका देशाचा कार्यक्रम आहे? असा सवाल देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MZh2gg

You might also like

Comments are closed.