Sanjay Raut | “भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे”; चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार
Sanjay Raut | मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी महापुरुषांविषयी केलेली वक्तव्ये तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होणारी वक्तव्ये यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली होती. परंतु, संजय राऊत यांच्या बोलण्यातील चूक शोधत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचं म्हंटल. याचा व्हिडीओ ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे मेंदू आहेत असं मला दुर्दैवाने म्हणावं लागतंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? त्या नात्याने आम्ही म्हटलं की ते आमचे आहेत. त्यांचा जन्म भारतातच झालाय.” आंबेडकरांचा जन्म १८९१ साली आत्ताच्या मध्य प्रदेशात झाला. तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. फक्त एकच मुंबई प्रांत होता. भाषिक राज्य कधी निर्माण झाली, याचा अभ्यास करावा. त्यांना कळतं का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “भाजपामध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक बाहेरून घेतलेत ते कळतंय. त्यांच्या जिभेवर काय, डोक्यात काय, पोटात काय? वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुलेंचा अपमान करतायत आणि आम्हाला शिकवतायत.”
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ ?
लो कर लो बात, सर्वज्ञानी संजय राऊत जी म्हणताहेत “बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला” अहो, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान. संपादक इतका अज्ञानी कसा राहू शकतो? भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला इतके सामान्य ज्ञान असू नये. महापुरूषांचा असा अपमान तुम्ही करायचा आणि स्वतःचं मोर्चे काढायचे मुर्ख समजू नका. महाराष्ट्र तुम्हाला पुरतां ओळखून आहे तुमचा जाहिर निषेध”, असे टीकास्त्र चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर सोडले.
संजय राऊत यांचं वक्तव्य काय?
लोकशाहीमध्ये असे घडु नये. पण, असे घडतय. ज्या महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ज्याने लोकशाही जन्माला घातली. त्या महाराष्ट्रात जे घडतय. ते महाराष्ट्राचे दुर्देव आहे. महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या दैवतांचा जो अपमान घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का?, असा सवाल राऊतांना विचारला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Mercedes Benz Electric Car | मर्सिडीज बेंजने सादर केली ‘ही’ इलेक्ट्रिक कार
- Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल; नेमकं प्रकरण काय?
- IND vs BAN | कुलदीपच्या कामगिरीने प्रशिक्षक झाले प्रभावित, म्हणाले…
- NCP | “हा महामोर्चा महाराष्ट्राचा, शिंदे गटासारखं पैसे देऊन…”; राष्ट्रवादीचा जोरदार हल्लाबोल
- Kiff 2022 | शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
Comments are closed.