Sanjay Raut | “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी…”, संजय राऊतांचं ट्विट चर्चेत

Sanjay Raut | मुंबई : राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. यादरम्यान, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरक यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपुर्वी राहुल गांधी यांच्यावर घणाघात केला होता. अशातच राऊत यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत केलेल्या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय.., असं संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यामध्ये वीर सावरकरांचा विषय नव्हता. हा तुमचा खासगी विषय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राला कायमच वीर सावरकरांचा गर्व वाटत राहणार. संपूर्ण देशाला सावरकरांचा अभिमान वाटतो. उद्धव ठाकरेंनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर. राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असा घणाघात संजय राऊतांनी राहुल गांधींवर केला होता.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.