Sanjay Raut | भ्रष्ट सरकारविरोधात अण्णा हजारे काहीच बोलत नाहीत – संजय राऊत
Sanjay Raut | नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नागपूर विधानपरिषदेत गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर सुधारगृहात घोटाळा केल्याचा आरोप केला. नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची जमीन याप्रकरणी एकांत शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना नागपुरातील कोट्यवधींच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिंदे यांनी केवळ दोन कोटी रुपयात 83 कोटी रुपयांची जमीन सोळा जणांना दिली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अन्ना हजारे यांना सवाल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “अण्णा हजारे यांनी ज्या भ्रष्ट्राचाराविरोधात रणशिंग फुंकले होते. त्यानंतर ते अचानक अदृश्य झाले. महाराष्ट्रात भ्रष्ट मार्गाने सरकार आले आहे. या भ्रष्ट सरकारविरोधात अन्ना हजारे यांनी जाब विचारल्याचे दिसत नाही. यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. देशभरात अनेक राज्याचे सरकार भ्रष्टाचार करुन आपले सरकार टीकवत आहेत. आमदार विकत घेत आहेत. अण्णा हजारे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकपाल आणण्यासाठी आवाज उठवला होता. त्यांच्याकडे लोकांच्या अपेक्षा होत्या. लोकपालाच्या किंवा लोकायुक्ताच्या कक्षेतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी गुप्त रितीने होईल. पण गुप्त का? खुली चौकशी करा, तेव्हा पाणी का पाणी होईल.”
हे प्रकरण विधानसभेत देखील चर्चेत आले. छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील यांनी यावर प्रश्न उपस्थित केले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावर विरोधकांनी एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली होती.
आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “नगरविकास मंत्री या नात्याने आपण कोणतीही चूक केली नाही. ही रक्कम 2009 मध्ये शासकीय दरानुसार वसूल करण्यात आली आहे. ही जमीन कोणत्याही बिल्डरला दिली नाही. 2007 मध्ये 49 ले-आऊट मंजूर झाले होते. 2015 मध्ये त्यावेळी 34 भूखंड मंजूर झाले होते. त्यावेळी एनआयटीच्या प्रमुखांनी रेडी रेकनरच्या दराने पैसे भरण्यास सांगितले. तर दुसऱ्याला गुंठेवारीनुसार पैसे देण्यास सांगितले. त्यावेळी वेगवेगळे दर नमूद केल्यामुळे हे प्रकरण आपल्याकडे अपीलासाठी आले होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूखंड घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार म्हणाले, 83 कोटींचा भूखंड 2 कोटीला देण्यात आला. हे प्रकरण उद्धव ठाकरे सत्तेत असताना भाजप नेत्यांनी समोर आणले होते. भाजपच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदेंविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंचा गट भाजपला मिळाला. त्यामुळे ते या प्रकरणातून माघार घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Panda Mini EV | टाटा नॅनोपेक्षा छोटी कार लाँच, देईल ‘या’ गाडीला टक्कर
- Weight Loss Tips | पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
- SATARA | भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात
- Sam Curran | पंजाब किंग्जमध्ये परतल्यानंतर सॅम करनने केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…
- Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा थंडीचा कहर, तापमानात झाली चौथ्यांदा घसरण
Comments are closed.