Sanjay Raut | “मलाही कुंडली कळते आणि त्यांच्या कुंडलीत…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut |  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बुधवारी शिर्डी येथे दर्शन घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका महादेवाच्या मंदिरात गेले. तेथील ज्योतिष्यांना मुख्यमंत्र्यांनी हात दाखवून भविष्य विचारल्याची चर्चा रंगली आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलेत.

ते म्हणाले, “महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जंतरमंतर आणि ज्योतिषी यांच्याभोवती फिरण्यापासून वेळ मिळत नाही. ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो, तेच लोक ज्योतिष्यासमोर हात दाखवतात. “मलाही कुंडली कळते आणि त्यांच्या कुंडलीत, येत्या काही महिन्यात स्तेतचा योग नाही. जनतेने त्यांची भावी कुंडली लिहिली आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसोबत कामाख्या देवीला जाणार आहेत. यावरूनही राऊत यांनी टीका केली. जे अघोरी विद्येत गुंततात त्यांनी हे जाणून घ्यावे की अघोरी विद्येत अडकलेल्यांचा अंत भयानक आहे. त्यांचा अंतही अघोरीसारखाच होईल, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या (Maharashtra-Karnataka border dispute) मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला. हा नव्याने निर्माण झालेला वाद स्क्रिप्टेड असल्याचे राऊत म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) भाजपने लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या मनातील संतापावरून लक्ष हटवण्याचा हा डाव असल्याचे संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.