Sanjay Raut | “मला ऐकू येणं कमी झालंय, १५ दिवस…”, संजय राऊतांनी सांगितल्या त्यांच्या तुरुंगातील यातना

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना १०२ दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. पत्राचाळा घोटाळा (Patrachal Scam) प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची बेकायदा असल्याचं म्हणत त्यांना जामीन मिळाला. अशातच संजय राऊत यांनी त्यांना तुरुंगात काय यातना झाल्या ते व्यक्त केलं आहे.

यावेळी, मी १०० दिवस जेलमध्ये होतो. जेलमध्ये एक एक तास १०० दिवसांसारखा वाटत होता. १५ दिवस मी ऊनही पाहिलेलं नव्हतं. कारण मला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यामुळेच मी आजारीही पडलो होतो. मी जर शरण गेलो असतो, तर मी जेलमध्ये कधीच गेलो नसतो. मी गप्प बसलो असतो तर मला कोणी जेलमध्ये पाठवलं नसतं. पण मला जेलमध्ये पाठवलं गेलं. पुन्हाही मला जेलमध्ये पाठवू शकतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

यादरम्यान, अंडा सेलमध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे सुरक्षा असं सांगितलं जातं. पण मूळ कारण म्हणजे एकांतवास. जेणेकरून लोकांशी संवाद होणार नाही. जास्तीत जास्त यातना व्हाव्यात आणि तुम्ही हार मानावी. जर सूर्यप्रकाश तुमच्या पर्यंत पोहोचला नाही तर तुम्हाला शारिरीक त्रास सुरू होतात. मी हे भोगलं आहे. माझं वजन १० किलो कमी झालं आहे. रात्रभर सुरू असलेल्या फ्लड लाईटचा मला त्रास होतंय. मला ऐकू येणंही कमी झालं आहे, असं देखील ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.