Sanjay Raut | “‘मविआ’चा भाग व्हायचं असेल तर…”; संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना दिला ‘हा’ सल्ला

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी युतीची घोषणा केली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.  त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली.

अशातच ”शरद पवार हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत”, असा दावा  प्रकाश आंबेडकर यांनी काल केला. या पार्श्वभूमीवर त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकर यांना असं महाविकास आघाडीच्या संभांवर बोलू नये असा सल्ला दिलाय.

ते म्हणाले, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे नेते आहेत. भाजपविरोधात (BJP) आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नातील शरद पवार हे मुख्य स्तंभ आहेत. सातत्याने ते या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. भाजपच्या यंत्रणेने सर्वात जास्त हल्ले हे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे मतभेद असतील पण त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत.”

पुढे ते म्हणाले, “सध्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची  (Vanchit Bahujan Aghadi) युती झाली आहे. पुढील काळात ते महाविकास आघाडीचे घटक व्हावेत अशी आमची इच्छा आहे. परंतु, असं होणार असेल तर त्यांनी या आघाडीचे जे प्रमुख स्तंभ आहेत त्यांच्यावर बोलू नये.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.