Sanjay Raut | “महागाई कमी झाली हो!”, सामनातून संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना (Saamana) आग्रलेखातून भाजप (BJP) पक्षावर घणाघात केला आहे. यावेळी महागाई बाबत भाष्य केलं आहे. राऊत यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. खाद्यतेलही महागले आहे, रोजचा भाजीपालाही स्वस्त होईना, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
देशात ज्वारी, बाजरी, गहू, महाग. कडधान्ये आणि डाळीही कडाडल्या आहेत. खाद्यतेलही महागले आहे. रोजचा भाजीपालाही स्वस्त होईना. तरीही केंद्र सरकार म्हणत आहे की, ‘देशातील महागाई कमी झाली हो!!’ एकीकडे महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्यांची त्यात होरपळ होत आहे आणि दुसरीकडे सरकार त्यावर ‘कागदोपत्री’ फुंकर घालून जनतेची दिशाभूल करीत आहे. अर्थात जनता अशा भुलथापांना यावेळी भुलणार नाही हे सरकारने लक्षात घ्याव, असं सामनातून म्हटलं आहे.
तसंच, आपल्या देशात जनता सतत वाढणाऱ्या महागाईने त्रस्त झाली आहे. अन्नधान्याच्या दरात विक्रमी दरवाढ झाल्याने खायचे काय, हा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे. तरीही ‘देशातील महागाई कमी झाली’ अशी एक बातमी सरकारी हवाल्याने प्रसिद्ध झाली आहे. आता सरकारीच हवाला तो ! त्याचा आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थितीचा कुठे संबंध असतो?, असा सवाल राऊतांनी केला आहे.
पुन्हा सरकारचे हे सगळे हवाले आकडय़ांची जोडतोड करून तयार केलेले असतात. त्यामुळे ‘कागदोपत्री’ फुंकर यापलीकडे त्याला काहीच अर्थ नसतो. सरकार मात्र स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत असते. आताही महागाई काही प्रमाणात कमी झाली, या सरकारी दाव्याबाबत यापेक्षा वेगळे घडलेले नाही, असं देखील संजय राऊत यांनी लिहिलं आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जी माहिती प्रसिद्ध केली त्यानुसार घाऊक आणि किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. घाऊक महागाईचा दर तर तब्बल 18 महिन्यांनी एक अंकी आकडय़ात आला आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kirit Somaiya | “येत्या दोन दिवसत…”, किरीट सोमय्यांचा ठाकरे पक्षाला गंभीर इशारा
- Sushma Andhare | “दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही”, सुषमा अंधारेंचा राणेंना खोचक टोला
- Sushma Andhare | “लाव रे तो व्हिडीओ हा त्यांचा…”, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर घणाघात
- Ajit Pawar | “दारू पिता का…” ; अजित पवारांनी घेतला अब्दुल सत्तारांचा समाचार
- Sanjay Raut | २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल – संजय राऊत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.