Sanjay Raut | “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मख्खमंत्री, खरे चालक तर देवेंद्र फडणवीस”; संजय राऊतांची बोचरी टीका
Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्रात सध्या अनेक मुद्द्यावरुन राजकारण सुरु आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या लाच प्रकरणी कालपासून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“देवेंद्र फडणवीस राज्याचे चालक” | Devendra Fadnavis Is The Ruler Of The State
“महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री लाभला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आहेत. पण राज्याचे खरे सूत्रधार तेच आहेत. राज्य तेच चालवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या घडामोडींविषयी आम्ही त्यांनाच प्रश्न विचारणार. असे प्रश्न विचारल्याबद्दल केंद्रातलं सरकार विरोधकांना तुरुंगात टाकतं. अशीच त्यांचीही इच्छा असेल तर त्यांनी टाकावं आम्हाला तुरुंगात. आम्ही प्रश्न विचारत राहू”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
“राज्यात सध्या जी अस्वस्थता, खदखद आहे, ती देवेंद्रजींनी समजून घेतली पाहिजे. शेतकरी, बेरोजगार रस्त्यावर उतरले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. अशावेळी गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्याबरोबरच्या गुन्हेगारांचा बचाव करावा लागतो. जे सत्तेत बसले आहेत. आणि हे आमच्या प्रिय देवेंद्रजींकडून अपेक्षित नाही”, असा टोला संजयय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
“काय होतास तू काय झालास तू” (Sanjay Raut said…)
“आम्ही त्यांच्याबरोबर पाच वर्षांची राजवट पाहिली आहे. त्यांचं प्रशासन पाहिलं आहे. पण ते देवेंद्र फडणवीस आम्हाला आता दिसत नाहीत. म्हणून आम्ही म्हटलं की “काय होतास तू काय झालास तू’. ही त्यांची मजबुरी आहे. त्यांचे हात दगडाखाली आहे. ते काढताही येत नाहीत आणि ठेवता ही येत नाहीत अशी त्यांची परिस्थिती झाली आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- Budget Session 2023 | “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काहीच गांभीर्य नाही, हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान”; विरोधी पक्षाची सरकारवर आगपाखड
- Eknath Shinde | ‘शेतकरी जगला तर राज्य जगेल’ अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “हे सरकार….”
- Big Breaking | महिलांसाठी आनंदाची बातमी; आजपासून एसटीने करा अर्ध्या तिकीट दराने प्रवास
- Bhaskar Jadhav | “राष्ट्रवादी पक्ष सोडायला नको होता, भाजपची ऑफर आली तर…”; भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य
- Job Opportunity | मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Comments are closed.