Sanjay Raut | महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित – संजय राऊत

Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: नागपूरमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख ‘नागपूरचा कलंक’ असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी टीका केल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राचं संपूर्ण सरकारच कलंकित असल्याचं संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्र इतका कलंकित कधीच झाला नव्हता, असही त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

The entire government of Maharashtra is tainted – Sanjay Raut

ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “महाराष्ट्राचे संपुर्ण सरकारच कलंकित आहे.PMLA कायद्यानुसार आरोपी कडील कलंकित धन दुसऱ्याच्या खात्यावर गेले की तो सुध्दा गुन्हेगार ठरतो. राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडील सर्व कलंकित खाती” खातेदारांसह भाजपा सरकार मध्ये सामील झाली..mony laundring चे हे सरळ प्रकरण आहे.ED ने संपुर्ण सरकारवरच PMLA नुसार कारवाई करायला हवी. महाराष्ट्र इतका कलंकित कधीच झाला नव्हता.”

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरलं होतं. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांची परिस्थिती सध्या इतकी विचित्र आहे की, त्यांना ती सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही.” राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणे अशक्य आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांची ही ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी त्यांना ‘नागपूरला लागलेला कलंक’ असं (Sanjay Raut) म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

 

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46JMF5u

You might also like

Comments are closed.