Sanjay Raut | महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप संशोधनाचा झालंय – संजय राऊत

Sanjay Raut | नवी दिल्ली: सध्या निधी वाटपावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप म्हणजे एक संशोधनाचा विषय झाला आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

निधी वाटपावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सध्या निधी वाटपाचा जो प्रकार समोर आला आहे, तो पैशांचा अपहार दिसत आहे. भरत गोगावले यांना 150 कोटींचा निधी दिल्याचं मी ऐकलं आहे आणि हे ऐकून मला मोठा धक्का बसला आहे.

कुणाला तरी शांत करण्यासाठी एवढा निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकारणात निधी वाटप एक संशोधनाचा विषय झाला आहे.” मंत्रीपद दिली नाही म्हणून तुम्ही त्याची किंमत देताय का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Democracy is being strangled – Sanjay Raut

यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मणिपूर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. देशभरातील संसदेचे प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहे आणि त्यांना मणिपूरवर चर्चा करायची आहे.

मणिपूरवर चर्चा करत असताना प्रधानमंत्री उपस्थित रहावं. मोदींनी संसदेच्या बाहेर मणिपूरवर वक्तव्य केलं आहे. त्यांना ते संसदेमध्ये करण्याची गरज आहे. मात्र, या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर विरोधीपक्षांचा आवाज दाबला जात आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “सरकार लोकशाही आणि संसदेला मानायला तयार नाही. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशानं मणिपूर प्रकरणावर चिंता व्यक्त केली होती.

त्या न्यायाधीशांवर भाजपचे काही नेते टीका करताना दिसत आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळं विरोधकांची भूमिका ही देशाची भूमिका आहे.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43yd1EQ

You might also like

Comments are closed.