Sanjay Raut – महाविकास आघाडीत संघर्ष; लोकशाही वाचवण्यासाठी त्याग… – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : सध्या आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या चर्चना उधाण आलं आहे. दोन्ही निवडणूका एकत्र होणार असल्याच्या चर्चा देखील आहे. तर दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकिसाठी पुण्यातली जागा महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi ) कोणत्या पक्षाकडे जाणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP) पुण्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केली आहे तर काँग्रेस (Congress) ही जागा सोडायला तयार नसल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलं आहे.

जिंकेल त्याची जागा या सूत्राने महाराष्ट्र व देश जिंकता येईल –

संजय राऊत ( Sanjay Raut) ट्विट करत म्हणाले की, कसेल त्याची जमीन याप्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे महाविकास आघाडीचं सूत्र ठरलं आहे. जे सर्वांनी समजून घेतलं तर ‘कसबा’प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा या सूत्राने महाराष्ट्र व देश जिंकता येईल. तसचं “संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाला थोडा – थोडा त्याग करावाच लागेल”. जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी ( Sanjay Raut) केलं आहे. या ट्विटमधून राऊतांनी (Sanjay Raut ) महाविकास आघाडीतील पक्षांनी समंजसपणा दाखवण्याचं आवाहन केलं आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1663033031471534080

Sanjay Raut Tweet On NCP And Congress

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पुण्याची जागा आम्हाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. कारण पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ( NCP) ताकद जास्त आहे. तसचं सर्वाधिक आमदार देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे जो पक्ष त्याठिकाणी मजबूत आहे त्याला ही जागा देण्यात यावी असं देखील अजित पवार म्हणाले होती. परंतु, काँग्रेसचा ( Congress) या मागणीला विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये आगामी निवडणुकांच्या जागांवरून मतभेद असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/42bl0H1

You might also like

Comments are closed.