Sanjay Raut | मी कारवाईला घाबरत नाही; नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत संजय राऊत यांचं ट्विट
Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: सत्ता संघर्षाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जहरी टीका केली होती. हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका, असं आवाहन संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये कलम 505 अंतर्गत संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संजय राऊत यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
संजय राऊत यांचं ट्विट (Sanjay Raut’s tweet)
नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्या पर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे.बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत . भविष्यात खटले दाखल होतील.असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का?सरकारने थेट गुन्हाच दाखल केला..मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे.
या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल.
#निर्भय_बनो
नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे "गठन"बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी… pic.twitter.com/I3jqIT8BuH
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 15, 2023
संजय राऊत नेमके काय म्हणाले? (What exactly did Sanjay Raut say?)
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष निकालानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते, “हे सरकार बेकायदेशीर आहे. लवकरच हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळू नये.” या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी जे आरोप केले होते, त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “माझ्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे एक प्रकारचे दबाव तंत्र आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यामुळे देशातील निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव भारतीय जनता पक्ष आखात आहे. कर्नाटकमध्ये कमळाच्या पाकळ्या गळाल्या आहे. हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा.”
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | राष्ट्रवादीला मोठा धक्का! पवारांच्या ‘या’ खास नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
- Nitesh Rane | महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची अवस्था सरदारासारखी; नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
- Sanjay Raut | हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीसांना आवाहन
- Devendra Fadnavis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची ‘ती’ मागणी मान्य करणार का?
- Karnataka Election | “कर्नाटकमध्ये विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी…” ; सामना अग्रलेखातून भाजपवर खोचक टीका
Comments are closed.