Sanjay Raut | “मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता”, अमृता फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Sanjay Raut | मुंबई : भाजपच्या अनेक नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवरून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी मोठं विधान केलं आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भारताचे नवीन राष्ट्रपिता आहे. असं त्या म्हणाल्या आहेत. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, संजय राऊतांना यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर संजय राऊतांनी सावध पवित्रा घेत सूचक प्रतिक्रिया दिली. “मी नि:शब्द आहे या सगळ्यावर. नवीन नवीन ज्या भूमिका येत आहेत, त्यावर मी नि:शब्द झालो आहे. मला सुचत नाही या विषयावर काय बोलावं ते. यावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच बोलतील. मी यावर बोलणं योग्य नाही”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
नेमकं प्रकरण काय ?
नागपूर येथे अभिरूप कोर्टाच्या एका कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या वेळी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना भारताचे नवीन राष्ट्रपिता असा उल्लेख केला. नरेंद्र मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्यानंतर मुलाखतकाराने महात्मा गांधी कोण? असा सवाल अमृता फडणवीस यांना केला. त्यावर अमृता फडणवीस उत्तर देत म्हणाल्या की, ”महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. तर, नरेंद्र मोदी हे देखील भारताचे नवीन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे तत्कालीन राष्ट्रपिता होते.”
महत्वाच्या बातम्या :
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील ब्लाइंड पिंपल्सपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Jayant Patil | फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीचा झेंडा! जयंत पाटील म्हणाले, “दलबदलूचे राजकारण…”
- Sanjay Raut | “दिल्लीला गेले तेव्हा गृहमंत्र्यांनी गुंगीचे इंजेक्शन टोचले का?”; राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीका
- Amruta Fadanvis | “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे नवे राष्ट्रपिता…”; अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
- Congress | “शिंदे-बोम्मईंना एकाच खोलीत बंद करा, कर्नाटक सीमाप्रश्न सुटेपर्यंत…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा अजब सल्ला
Comments are closed.