Sanjay Raut | मुंबई: मणिपूर राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. माणिपूरची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असून या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे.
अशात काही दिवसांपूर्वी मणिपूरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काही लोक महिलांवर अत्याचार करताना दिसले होते.
या व्हिडिओनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “जगासमोर मणिपूर फाइल्स ओपन झाल्या आहे. या प्रकरणावर लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
मणिपूरमध्ये घडलेली फक्त हीच एक घटना नाही तर या ठिकाणी अशा अनेक घटना घडल्या आहेत. मणिपूरमध्ये असलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ले होत आहे. तरीही तिथलं सरकार शांत आहे. सरकार फक्त आणि फक्त तमाशा बघायचं काम करत आहे.”
The situation in Manipur is getting worse than Kashmir – Sanjay Raut
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “मणिपूरची अवस्था काश्मीरपेक्षा भयंकर होत चालली आहे. तरीही केंद्र सरकारला मणिपूरकडं दुर्लक्ष करायचं आहे.
सरकार काश्मीरकडं लक्ष देतं. कारण तिथे त्यांना हिंदू-मुस्लिम प्रकरणावरून राजकारण करता येतं. मात्र, मणिपूर प्रकरणामध्ये भाजप सरकारला राजकारण करता येत नाही. म्हणून सरकार मणिपूरकडं दुर्लक्ष करत आहे.”
“मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारातून भाजपला कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा होणार नाही. म्हणून भाजपवाले मणिपूर मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याप्रकरणी भाजप सरकार चूप बसलेत, शांत बसलेत”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane | “किती मोठे उपकार उद्धव साहेब आपले…”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Eknath Shinde | इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं
- Ajit Pawar | “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”; ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधाण
- Opposition Party | जितेगा भारत! विरोधकांच्या INDIA ची टॅगलाईन ठरली
- Eknath Shinde | “सत्ताधारी असो वा विरोधी पक्षाचा नेता सर्वांनी…”; इर्शाळवाडी घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
Original NEWS SOURCE – https://bit.ly/46Wzv5l