Sanjay Raut | ‘या देशाचा फैसला उद्या होणार’ ; सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाच्या निकालावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “भारतामध्ये लोकशाही आहे की नाही याचा उद्या निकाल लागणार आहे. पाकिस्तानच्या संविधानाप्रमाणे आपले संविधान जळून खाक होणार आहे का? हे देखील उद्याच कळणार आहे. उद्याचा न्यायालयाचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. उद्या या देशाचा फैसला होणार आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “कायदा हा एका व्यक्तीला कळतो असं नाही. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाची माहिती आहे. मात्र स्वतः ला कायदे पंडित समजणाऱ्या अध्यक्षांना ही माहिती नसेल. त्यामुळे मला या राज्याची चिंता वाटत आहे, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकरांनी राजीनामा द्यावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या वक्तव्याला नार्वेकरांनी उत्तर दिलं आहे.“संजय राऊत यांचा संविधानाचा अभ्यास कमी असल्यामुळे आणि संविधानातील तरतुदींचे वाचन न केल्यामुळे त्यांच्याकडून असे बेजबाबदार वक्तव्य केले जातात. त्यामुळे जनतेनं त्यांना माफ करावं असं मला वाटतं.”
महत्वाच्या बातम्या
- IND vs Pak | भारत पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक सामना
- Eknath Shinde | “सध्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी…” ; आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप
- Supreme Court | मोठी बातमी! सत्ता संघर्षाचा निकाल लागणार उद्या, सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निर्णय
- Nitesh Rane | “उद्धव ठाकरेंनी मुंबईत दंगली भडकवण्यासाठी बैठक घेतली होती” ; नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य
- Sanjay Shirsat | “शरद पवार यांनी भाकरी न फिरवताच अजित पवार यांची जिरवली” : संजय शिरसाट
Comments are closed.