Sanjay Raut | “राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा” : संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई :  येत्या तीन दिवसांत सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे – ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं आहे. तर राज्यातील आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याच हातात येईल, असं राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी म्हटलं होतं. त्यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट निशाणा साधत नार्वेकर यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे.

देशात आजही संविधान आहे : संजय राऊत 

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. तर राहुल नार्वेकर यांची कायद्या मंत्र्यासोबत बैठक झाली होती. कायदा मंत्र्यानी बंद दरवाजाआडच्या बैठकीत काय होणार हे सांगितलं का? तुमच्याकडेच प्रकरण येईल हे तुम्हाला कसं माहीत? ही कोणती दादागिरी आहे? कायदा मंत्री तीन तास बंद दाराआड चर्चा करतात हे काय चाललंय? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. तसचं राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, अजूनही आम्हाला अशा आहे की निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. कारण आजही देशात संविधान जिवंत आहे. यामुळे आम्ही न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. भाजपकडून कोर्टाच्या निकालावर दबाव टाकण्यात येत आहे. असं देखील राऊत म्हणाले.

( The country still has a constitution: Sanjay Raut)

दरम्यान, संजय राऊत यांनी सांगितलं की, जर नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला होता. तर त्यांच्याकडेच हे प्रकरण गेलं पाहिजे. त्यांचा निर्णय दुसरा अध्यक्ष फिरवू शकत नाही असा सवाल देखील उपस्थित केला. यामुळे भाजपने किंवा मिंदे गटांने काहीही करू द्या सरकार लवकरच बदलणार आहे. निकाल आमच्याच बाजूने लागणार. यामुळे आता सत्तांतर होणार की नाही हे येत्या तीन दिवसात समजणार आहे. जर सत्तांतर झालं तर राज्याची राजकीय समीकरणे बदलताना पाहायला मिळणार आहेत. यामुळे सर्वांचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या-