Sanjay Raut | लोकप्रिय नेत्यांच्या सभांसाठी माणसं जबरदस्तीनं आणली जातात; संजय राऊतांची राज्य सरकारवर खोचक टीका
Sanjay Raut | मुंबई: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिक शहरामध्ये दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. लोकप्रिय नेत्यांच्या सभांसाठी जबरदस्तीनं माणसं आणली जातात, असं संजय राऊत म्हणाले आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, “राज्य सरकारच्या कार्यक्रमांना जनतेनं उस्फूर्तिनं प्रतिसाद दिला पाहिजे. मात्र इथे लोकप्रिय नेत्यांच्या सभेसाठी माणसं जबरदस्तीनं आणली जातात. हे स्पष्ट दिसत आहे.
रस्त्यावर खड्डे असल्यामुळं अजित पवार रेल्वेनं नाशिक शहरात दाखल झाले आहे. म्हणजे या खड्ड्यातून सुद्धा जनतेनंच प्रवास करायचा आहे. त्यांना काय तो कार्यक्रम करू द्या. मात्र, जनता कुणाच्या दारात आहे, हे त्यांना लवकरच कळेल.
The state government itself is putting up banners to welcome them – Sanjay Raut
पुढे बोलताना ते म्हणाले, “जनतेपर्यंत जर योजना पोहोचल्या असत्या तर जनता स्वतःहून त्यांच्या कार्यक्रमाला गेली असती. परंतु जनता त्यांच्या कार्यक्रमाला यायला तयार नाही. योजना फक्त कागदावर दिसत आहे.
या योजनांचा कमिशन कुठं गेलं हे सर्वांना माहीतच आहे. राज्य शासन स्वतः स्वतःच्या स्वागतासाठी बॅनर्स लावत आहे. अजित पवार गट सरकारमध्ये टिकेल की नाही याबाबत मला शंका वाटत आहे.”
“शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नाही. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला अजिबात पटलेला नाही.
अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या लोकांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. तर शिवसेना फोडण्यापुरता शिंदे गटातील नेत्यांचं महत्त्व आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचं महत्त्व आता संपलेलं आहे”, असही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | अजित पवार मैदानात! नाशिकमध्ये करणार जोरदार शक्तिप्रदर्शन
- Uddhav Thackeray | बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी…दोन वांझ भाषणे; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
- Ajit Pawar | अजित पवारांना अर्थ खात, तर गटातील इतर नेत्यांना मिळाले ‘हे’ खाते
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची कूटनीती आपल्याला कुटून टाकायची – उद्धव ठाकरे
- Raj Thackeray | “मी उद्धव ठाकरेंसोबत युती करणार…”; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3K046Fj
Comments are closed.